मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रनौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनाने जणू नेपोटीजमविरुद्ध बंडच पुकारलं आहे. मात्र, आता कंगणालाच भीती वाटू लागल्याचं तिनं ट्विटरवर सांगितलं आहे.
ट्विटरील माझे मित्र, मुव्ही माफिया आणि त्यांच्या अँटिनॅशनल हिंदुफोबिक रॅकेटमध्ये असलेले, मी जे काही बोलते त्याला एकपक्षीय मानू शकतात. मला माहित आहे ट्विटरवर मी खूप कमी वेळ आहे माझं अकाउंट केव्हाही सस्पेंड होऊ शकतं. माझ्याकडे शेअर करण्यासाठी खूप काही आहे. मात्र, मी वेळेचा अधिक उपयोग त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी करेल, असं कंगनाने तिचं ऑफिशिअल ट्वीटर अकाउंट मानलं जाणाऱ्या ‘टीम कंगना रनौत’ या अकाउंटवरून म्हटलं आहे.
अभिनयाबरोबरच कंगना तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये कंगनाने बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांवर ट्वीटरच्या माध्यमातून आरोप केले आहेत. तसेच तिने अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूडमधील संबंधांविषयी आपलं मत बेधडकपणे ट्वीटरवरून मांडलं आहे. कंगनाच्या बेधडक वक्तव्यांमुळेच कंगनाचं ट्वीटर अकाउंट केव्हाही बंद होवू शकतं, असं कंगनाने म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी कंगनाचं ट्वीटर अकाउंट कंगनाची बहिण आणि मॅनेजर रंगोली चंदेला चालवत होते. मात्र, कंगनाचं ते अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होत. त्यानंतर आता ‘टीम कंगना रनौत’ हे तिचं अकाउंट कंगनाच ऑफिशिअल अकाउंट मानलं जातं पण हे ही अकाउंट बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
My friends here may find my talks unidimensional, mostly directed at movie mafia,their antinational and Hinduphobic racket.I know my time is limited here,they can get my account suspended any minute, even though I have a lot to share but I must utilise this time to expose them🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 17, 2020
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून पुन्हा गृहमंत्री अमित शहांना रूग्णालयात केलं दाखल
“खोट्या बातम्या पसरवणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी चीनकडून पैसे घेतले आहेत”
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन
पुन्हा एकदा ‘या’ जिल्ह्याला महापुरचा धोका; 104 गावांना सतर्कतेचा इशारा