मोदी-शहांची चिंता वाढली! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का

नवी दिल्ली | आगामी काळात उत्तर प्रदेशासह पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा दिल्ली तक्ताकडे जाण्याचा रस्ता समजला जातो.

या कारणास्तव भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी पुर्ण ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत.  उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांची कमालीची लोकप्रियता वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

उत्तर प्रदेशातील सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या घोषणांना जोरदार शह देण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. अलीकडेच एका सर्व्हेनुुसार भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत.

एबीपी सी व्होटरने केलेल्या सर्व्हेतील आकडेवारीनुसार भाजपच्या 100 जागा कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेत एकूण 403 जागा आहेत. यावेळी भाजपला 213 ते 121 जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 325 जागी विजयी झालं होतं. तर काँग्रेसला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात उलटफेर होण्याची शक्यता आहे.

यावेळेस समाजवादी पक्षाच्या 100 जागा वाढतील असंही सर्व्हेत म्हणण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाला 2017 साली 48 जागा मिळाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 100 जागा कमी होऊन समाजवादी पक्षाच्या पारड जड होईल असं दिसतयं.

काँग्रेसने निवडणुकीकरिता कंबर कसली तरी देखील काँग्रेसच्या जागा जास्त वाढताना दिसणार नाहीत, असं एबीपी सी व्होटर सर्व्हेनुसार दिसत आहे. काँग्रेसला केवळ 6 ते 10 हा आकडा गाठता येऊ शकतो.

गेल्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला जागा 19 मिळाल्या होत्या. आताही बसपाला 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या चार महिन्यातील सर्वेनुसार भाजपच्या जागा कमी होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 41 टक्के तर समाजवादी पक्षाला 31 टक्के तसेच काँग्रेसला 9 टक्के मतदान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रियंका गांधी यांनी महिलांना 40 टक्के तिकीट देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच बेटी हूँ लढ सकती हुँ हा नारा देखील दिला होता. परंतु, सर्वेनुसार भाजप सत्तेत कायम राहणार असंच दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

राज ठाकरे-शरद पवार बैठकीत काय झालं?; आली ‘ही’ माहिती समोर

“ठाकरे सरकार छत्रपतींची नाही तर पाकिस्तानची औलाद”

‘हिंदुत्व म्हणजे मुस्लीम किंवा…’; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा

 “फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ नितेश राणेशी आहे”