मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिलं. याशिवाय, एक महागडा मोबाईलही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असंही धनजंय मुंडे यांनी सांगितलं आहे.
मलबार हिल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केलं आहे. आता या तपासातून कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं सांगितलं जात होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका नव्हे तर भोवळ आल्याची माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
“देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय”
दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबच्या फलंदाजांचे लोटांगण; 9 गडी राखत दणक्यात विजय
पिंपरी-चिंचवडचे डाॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली!
नवरा मध्यरात्री उठून असं काही करायचा की…; बायकोला तर धक्काच बसला