‘आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही’; यशोमती ठाकूर अन् रवी राणांमध्ये खडाजंगी

अमरावती | अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

रवी राणा यांनी आपल्याला बोलायचं असल्याचं सांगत आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याने आक्षेप नोंदवला. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची मागणी रवी राणा यांनी केली. यावेळी बोलताना त्यांचा आवाज वाढला.

रवी राणा यांनी आवाज वाढवल्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर संतापल्या. आवाज पाहून यशोमती ठाकूर यांनी त्यांना आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही. इथे दादागिरी चालणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचं नाटक सोडून लोकप्रतिनिधींशी कसं वागावं हे शिकावं, असा टोला लगावलाय.

दरम्यान, शेतकरी इथे आत्महत्या करत आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे..संत्र खराब झालेलं आहे…त्याच्यावर काय करणार आहात आपण? शेतकऱ्याची दिवाळी साजरी होणार आहे की नाही? त्याच्या खात्यात पैसे टाकणार आहात की नाही? या सभागृहात एकमताने ठराव घ्या की मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या आधी 28 तारखेच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले पाहिजेत…तर त्या शेतकऱ्याची दिवाळी होईल, असं रवी राणा म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे- नाना पटोले

“आर आर आबांनी मला त्याचवेळी सांगितलं होतं, गृहमंत्री झाल्यावर…”

पाहा काय आहे पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

कॉलेज येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरू, वाचा काय आहे सरकारची निमावली

सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचे दर