दणदणीत विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लखनऊ | जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात निवडणूक ही एखाद्या सणाप्रमाणं साजरी केली जाते. निवडणुकीच्या निकालानंतर जय-पराजय मोठ्या मनानं स्विकार केले जातात.

देशातील सर्वात जास्त आमदार असलेलं राज्य म्हणून उत्तर प्रदेशची ओळख आहे. 403 विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता निकाल हाती येत आहेत.

आतापर्यंतच्या निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये इतिहास घडत असल्याचं लक्षात येत आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत.

तब्बल 250 पेक्षा अधिक जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत, किंबहूना ते जवळपास विजयाच्या समीप पोहोचले आहेत. परिणामी योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संबोधित केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाला आणि सुशासनाला जनतेनं स्विकारलं आहे. आम्हाला परत सत्ता दिल्याबद्दल जनतेचे आभारी आहोत, असं योगी म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आहेत.

अवघ्या देशाच नव्हे तर जगाचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडं लागलं होतं, असं योगी म्हणाले आहेत. योगींनी पक्षाच्या कार्यालयात जनतेला संबोधित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी सांगितलं होतं ते ते घडत गेलंय, आता 11 तारखेला …”

“महाराष्ट्र अभी बाकी म्हणणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है”

पंजाबमधील पराभवानंतर शरद पवारांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला, म्हणाले… 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं!

काँग्रेसलाजमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं!