उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार?, वाचा एक्झिट पोलचा अंदाज

लखनऊ | उत्तर प्रदेशातला एक्झिट पोल भाजपच्या बाजून आलाय. उत्तर प्रदेशात (Up Elections 2022) पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय.

TV9 पोलेस्टरच्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 146 ते 160, बसपाला 14 ते 24, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात.

युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शहा यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

यूपी विधानसभेत एकूण 403 जागा आहेत आणि बहुमतासाठी 202 जागा आवश्यक आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे, पण त्यांना किमान 100 जागांचं नुकसान होत आहे

सुरुवातीच्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिल्याचं दिसून येत आहे. यूपी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सपा यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.

सपा भाजपला कडवी झुंज देत आहे. दोघांमध्ये काटे की टक्कर होणार असेच एकंदरीत चित्र दिसतंय. समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आणि बहुजन समाज पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. भाजपला जागांचं मोठं नुकसान होताना दिसत असून सपा दीडशेहून अधिक जागा मिळवण्याच्या स्थितीत आहे.

महत्वाच्या बातम्या-

दोन विमानं समोरा समोर, ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या 

“येणारे येतीलच पण पंतप्रधानपदाची खुर्ची नशिबी येणार नाही हे मात्र नक्की” 

“अमेरिकेच्या विमानावर चीनचा झेंडा लावून रशियावर हल्ला करा”

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी