महिन्याला फक्त 12 हजार रुपयात घरी आणू शकता स्वतःच्या ‘या’ गाड्या!

नवी दिल्ली | मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकी नेहमीच आपल्या ग्राहकांच्या आवडी आणि सोईनुसार वेगवेगळ्या ऑफर्स आणत असते. कंपनीने आता अशाच आणखी एका मोठ्या ऑफरची घोषणा केली आहे.

मारुती सुझुकीने आपल्या सबस्क्रिप्शन प्रोग्रॅम अंतर्गत Wagonr, Ignis, S-Cross या गाड्यांना शामिल करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच या गाड्यांना आता तुम्ही डाऊनपेमेंट न करता देखील खरेदी करू शकता.

मारुती सुझुकीच्या सबस्क्रिप्शन प्रोग्रॅम लिस्ट अंतर्गत ज्या काही गाड्या येतील त्या गाड्या खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं डाऊन पेमेंट करावं लागणार नाही. या गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला महिन्याला केवळ हप्ता भरावा लागेल. त्यामुळे आता मारुती सुझुकीच्या गाड्या खरेदी करणं सोयीस्कर होणार आहे.

मारुती सुझुकीच्या वैगनार या गाडीला खरेदी करण्यासाठी केवळ महिन्याला 12, 722 रुपये हप्ता भरावा लागेल. वैगनार साठीचा हा हप्ता तुम्हाला 48 महिने भरावा लागेल. ही किंमत दिल्लीसाठी आहे. या हप्त्यांमध्ये कर देखील पकडण्यात आले आहेत.

मारुती सुझुकीच्या सबस्क्रिप्शन प्रोग्रॅम लिस्टमध्ये विटारा ब्रेजा, स्विफ्ट, डिजायर, अर्टिगा, बलेनो, सियाज और एक्सएल 6 या गाड्या अगोदरच होत्या. मात्र, आता नव्याने काही गाड्यांची नावे या लिस्टमध्ये सहभागी करण्यात आल्या आहेत.

सध्या मारुती सुझुकीचा सदस्यता कार्यक्रम देशातील 7 शहरांमध्ये चालू आहे. मारुती सुझुकीचा हा सबस्क्रिप्शन उपक्रम त्या लोकांसाठी एक फायदेशीर उपक्रम मानला जातो, ज्या लोकांना नवीन कार खरेदी करायची आहे. मात्र, बजेटच्या अडचणीमुळे ते गाड्या खरेदी करू शकत नाहीत. या उपक्रमाचा अवधी 24 ते 48 महिने इतका आहे.

दरम्यान, अलीकडे काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन कार भारतीय बाजारात लौंच झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कार खरेदी करण्यासाठी लोकांची देखील झुंबड उडालेली पहायला मिळाली आहे. गेल्याचं महिन्यात भारतीय वाहन कंपन्यांनी आपल्या विक्रीत डिसेंबर महिन्यांत सरासरी 10 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-