कोथिंबिरीचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

पुणे | कडधान्यांची उसळ, आमटी किंवा स्वयंपाकातील कोणताही चटपटीत पदार्थ म्हटलं की गृहिणींचा कोथिंबीर हवीच हा हट्टच असतो. कोथिंबिरीमुळे भाज्यांना एक वेगळा सुवास येतो. तसेच कोथिंबिरीमुळे पदार्थ आणखी चविष्ट बनतात. त्यामुळे कोथिंबिरीला सर्वांचीच पसंती असते. आज आपण याच कोशिंबिरीचे आणखीही काही गुणकारी फायदे जाणून घेऊयात.

कोथिंबिरीची चटपटीत चटणी तर सर्वांनाच माहीत असेल. कोथिंबिरीची हीच चटणी शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते. रोज जेवताना ही चटणी खाल्ल्यास जेवणावरील ईच्छा कमी होणे, पोटात गॅस होणे, आम्लपित्त, अपचन यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांची आग होत असेल किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळे आली असतील तर अशावेळी कोथिंबिरीचे सेवन गुणकारी ठरते. तसेच रोज सकाळी कोथिंबिरीची 10-12 पानं आणि पुदिन्याची 7-8 पानं पाण्यात उकळावीत आणि ते पाणी प्यावे. यामुळे शरीरात असणारे विषारी घटक शरीरातून बाहेर टाकले जातात.

दरम्यान,  कोथिंबिरीच्या सेवनामुळे हातपायांची जळजळ कमी होते. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच कोथिंबीरीमुळे वजनही नियंत्रणात राहते.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील पवार-फडणवीसांचा ‘हा’ योगायोग महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा तर नाही ना?

‘आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे, जगाला भारताकडून अपेक्षा आहेत’; लाल किल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावला

“महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे”

मनोरंजन विश्वातल्या ‘या’ लोकप्रिय जोडीनं अखेर घटस्फोट घेतला

…म्हणून सख्या भावानेच भावाला जाळलं; बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार!