देश

युवक काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल!

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्यानं युवक काँग्रेसकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहलाल नेहरू यांचे स्वतंत्र लढ्यात मोठे योगदान आहे, त्यांच्या दूरदृष्टीतून आरोग्य,शिक्षण, सहकार, सार्वजनिक उद्योग, दळणवळण, शेती, सिंचन , संशोधन यांसह विविध क्षेत्रात उभ्या केलेल्या संस्था आज देशाला मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडवून आणली, संशोधनावर भर देत विकासाला अधिक गतिमान करण्याचे काम त्यांनी केले, देशासाठी लढत आपले प्राणाची आहुती दिली. अशा निःस्वार्थ भावनेने काम केलेल्या दिवंगत पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचे काम भाजप प्रवक्ते सांबीत पात्रा यांनी केल्यामुळे देशभर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासह करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रीजकिशोर दत्त यांनी म्हटलं आहे.

देशात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संबित पात्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दत्त यांनी दिली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोपर्यंत अशा प्रवृत्तींना सजा होत नाही, तोपर्यंत कायदेशीर मार्गाने लढाई सुरूच राहील, असे ब्रीजकिशोर दत्त यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

-कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका- राहुल गांधी

-काँग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते- एकनाथ खडसे

-“चुकीची माहिती दिली म्हणून मंत्री अनिल परब यांना अटक होणार का?”

-केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी