पक्ष, जात, कारखानदार किंवा मोठ्या घरचा मुलाहिजा न ठेवता कारवाई करा- संभाजीराजे

पुणे | निराधार तसेच मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाला झालेल्या मारहाणीचा आता सर्वच स्थरातून निषेध होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता, अशी आठवणही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितली.

अश्या प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे.
पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? अक्षय बोऱ्हाडे च्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी सूचनाही करतो, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

खासदार संभाजीराजे यांची पोस्ट-

अक्षय बोऱ्हाडेचा व्हिडीओ-

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून 11 वर्षीय मुलीनं आपल्या आईविरोधातच दाखल केला गुन्हा

-…म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

-अक्षय बोऱ्हाडेच्या आरोपांवर काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचं स्पष्टीकरण

-खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

-“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”