मोठी बातमी! झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला ‘तो’ प्रस्ताव

नवी दिल्ली | युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांना चर्चेसाठी प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

झेलेन्स्की यांनी ट्विट करत शांततेच्या प्रस्तावाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी त्यामध्ये रशियासोबच चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.

इस्रायली पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीवर चर्चा केली. आम्ही रशियन आक्रमण आणि शांतता चर्चेच्या संभाव्यतेबद्दल बोललो.

आपण नागरिकांवरील दडपशाही थांबवली पाहिजे. मेलिटोपोलचे महापौर आणि स्थानिक सार्वजनिक व्यक्तींच्या सुटकेसाठी मी इस्रायली पंतप्रधानांची मदत घेतली असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

याशिवाय, युक्रेनमधील रशियाच्या कारवायांचे समर्थन करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी त्याचा शेजारी देश बेलारूसवरही निर्बंध लादले आहेत.

22 फेब्रुवारी रोजी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डोनेस्तक आणि लुहान्स्कला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी त्यांच्या सैन्याला युक्रेनमध्ये विशेष लष्करी ऑपरेशन सुरू करण्याची परवानगी दिली होती.

रशिया युक्रेन युद्धाला आजा 17 वा दिवस आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने पुन्हा एकदा सांगितले की मॉस्कोचे विशेष लष्करी ऑपरेशन केवळ युक्रेनियन लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे आणि तेथील नागरी लोकसंख्येला धोका नाही.

पाश्चात्य देशांनी रशियाचे दावे फेटाळले आहेत आणि युक्रेनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून मॉस्कोवर व्यापक निर्बंध लादले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांचं नाव लावताना” 

“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार” 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील” 

“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही” 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान