कॉंग्रेसचा लखलखता तारा निखळला; कॉंग्रेसच्या ‘या’ बड्या खासदाराचं कोरोनानं निधन!

चेन्नई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आता कोरोनामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. कॉंग्रेसचे कन्याकुमारीतील खासदार एच. वसंत कुमार याचं कोरोनानं निधन झालं आहे.

एच. वसंत कुमार यांना कोरोनाची लागण झाल्यानं 10 ऑगस्ट पासून चेन्नई मधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. रुग्णालयात जवळपास 18 दिवस एच. वसंत कुमार कोरोनाशी झुंज देत होते, मात्र, शुक्रवारी रात्री अखेर त्यांना कोरोनाशी लढण्यात अपयश आलं आणि उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

एच. वसंतकुमार तामिळनाडूमधून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2019ला त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि लोकसभा निवडणूकीत विजय मिळवत पहिल्यांदाच दिल्ली गाठली. एच.वसंतकुमार आपलं काम आणि पक्ष दोन्हीबरोबर नेहमीच प्रामाणिक राहिले आहेत.

एच. वसंतकुमार यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीटरवर एच. वसंतकुमार यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केलं आहे.

एच. वसंतकुमार यांच्या कोरोनामुळे निधनाच्या बातमीने धक्काच बसला आहे. जनतेची सेवा करण्याची आणि कॉंग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची वसंतकुमार यांची वृत्ती नेहमीच हृदयात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि स्नेही यांच्यासमवेत सहवेदना, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, लोकसभा सदस्य एच. वसंतकुमार यांच्या निधनानं दुःख झालं. सामाजिक क्षेत्राबरोबरच व्यावसायिक क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. नेहमीच त्यांना भेटल्यानंतर तामिळनाडूच्या प्रगतीसाठी त्यांचे प्रयत्न मला जाणवले. त्यांचे कुटुंब तसेच स्नेहींबरोबर सहवेदना. ओम शांती, असं म्हणत एच.वसंतकुमार यांच्या निधनावर नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“गांजा घेणाऱ्या सुशांतच्या मृत्यूची चर्चा पण रेवणनाथच्या मरणाची नाही”

पाकिस्तानची छुपी चाल उघड; भारत पाक सीमेवर सापडलं मोठं भुयार

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ ज्यूस ठरू शकतो वरदान!

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंच नाव भाजपच्या कोणत्याही नेत्यानं घेतलेलं नाही- देवेंद्र फडणवीस

‘सुशांतच्या आत्महत्येमागे ‘या’ अभिनेत्रीचा हात असावा’; रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या घरच्यांची भेट