दोडक्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क; जाणून घ्या!

मुंबई | अनेक लोकांच्या आहारात दोडक्याची भाजी सामान्यपणे आढळत असते. याच दोडक्याला काही ठिकाणी शिरोळे तर काही ठिकाणी कोशातकी अशा विविध नावांनी ओळखले जाते. दोडका खाताना काहीजण नाक मुरडत असतात. पण हाच दोडका आपल्या आरोग्यासाठी भरपूर लाभदायी आहे.

सामान्यपणे आपण खातो तो गोड दोडका म्हणून ओळखला जातो. या गोड दोडक्याचे अनेक औषधी गुण असतात. दोडका ही एक पथ्यकर भाजी आहे. मधुमेह आणि स्थौल्य यांसारख्या आजारात दोडका उकडून खाल्ल्यास लाभदायी ठरतो.

सतत पाय दुखणे, पोट फुगणे, सतत काम केल्याने थकवा येणे, थोडी थोडी लघवी होणे या विकारांमध्ये दोडक्याच्या फोडी किंवा भाजी खाल्ल्यास अथवा दोडक्याचा रस पिल्यास या विकारांपासून सुटका मिळते.

ज्या लोकांना आपलं वजन वाढवायचं आहे, त्या वाक्तींनी आहारात दोडक्याचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होते. तसेच दोडक्याच्या मुळांचा उपयोग मुतखडा पाडण्यासाठी होतो.

महत्वाच्या बातम्या-

अंकिता आणि रियानंतर सुशांतच्या तिसऱ्या एक्स गर्लफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासा

चेहऱ्यावरील डाग घालवण्यापासून ते केस गळती थांबवण्यापर्यंत अनेक समस्यांसाठी काकडी असते गुणकारी; सविस्तर वाचा

पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं

कोण आहे राधिका मेहता?; सुशांत मृत्युप्रकरणी ईडीचा धक्कादायक खुलासा!

घृणास्पद! आईनेच पोटच्या लेकीला दाखवला पॉर्न व्हिडीओ अन् मग…