अंकिता आणि रियानंतर सुशांतच्या तिसऱ्या एक्स गर्लफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. मुंबई आणि बिहार पोलिसांबरोबरच सीबीआय आणि ईडी याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती समवेत अनेकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

ईडीकडून सुशांतची आणखी एक एक्स गर्लफ्रेंड असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत एका फ्लॅटचे भाडे भरत होता. या फ्लॅटमध्ये सुशांतची एक्स गर्लफ्रेंड राहत असल्याचं बोललं जात आहे. पण ही एक्स गर्लफ्रेंड कोण आहे? याचा खुलासा अद्याप करण्यात आला नाही.

सुशांत ज्या बँक खात्यातून या घराचे हप्ते भरत होता त्या बँक खात्यात जवळपास 35 लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. सुशांतच्या या डायरीमधून पोलिसांना बरीच माहिती मिळाली होती. सुशांत या डायरीमध्ये आपल्या आर्थिक नोंदीही ठेवत होता.

महत्वाच्या बातम्या-

चेहऱ्यावरील डाग घालवण्यापासून ते केस गळती थांबवण्यापर्यंत अनेक समस्यांसाठी काकडी असते गुणकारी; सविस्तर वाचा

पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं

कोण आहे राधिका मेहता?; सुशांत मृत्युप्रकरणी ईडीचा धक्कादायक खुलासा!

घृणास्पद! आईनेच पोटच्या लेकीला दाखवला पॉर्न व्हिडीओ अन् मग…