कोरोना बरा होण्यासाठी दररोज गाढविनीचं दूध प्या; या नेत्यानं तोडले अकलेचे तारे

पटना | कोरोना विषाणूने सर्व जगभरात हैदोस घातला आहे. या आजाराने मोठ-मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडू लागली आहे. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ कोरोनावरील लस शोधत आहे. अशातच दररोज गाढविनीचं 2 चमचे दुध पिल्याने कोरोना बरा होतो, असा जावई शोध  बिहारच्या ‘जन अधिकार पार्टी’चे अध्यक्ष पप्पू यादव यांनी लावला आहे.  तप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनावर पप्पू यादव यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाचा रामबाण उपचार गाढविनीचं दुध प्या, 2 चमचे 2 दिवस 2 वेळा पैजेवर सांगतो हा उपाय केला तर गाढवाच्या डोक्यावरील शिंग गायब आहेत तसा कोरोना गायब होईल, अशा प्रकारचा कोरोनावरचा रामबाण उपाय असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे.

तुम्ही 1 एप्रिल आणि 5 एप्रिलच्या भानगडीत का पडताय?, 23 मे 2014 पासून, प्रत्येक दिवस 1 एप्रिल आहे. तुम्हा सर्वांना ते मूर्खच समजतात!, असंही यादव म्हणाले.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून लोकांना मूर्ख बनवत आहेत. तसेच जो पंतप्रधान अंगण, दालन, शेत-धान्याचे कोठाऱ्याबद्दल न बोलता घराच्या बाल्कनीबद्दल बोलतो समजून जा मोठा ठग आहे, अशी जहरी टीका यादव यांनी केली आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या –

-सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

-आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

-दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल

-दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

-कोरोनाविरोधातली लढाई मिळून लढू; मोदी-ट्रम्प यांची फोनवरून चर्चा