सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

सांगली | इस्लामपूरात कोरोनामुळे सुरुवातीला जितके रुग्ण आढळून आले आता तसे रुग्ण वाढणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते फेसबुक लाईव्हद्वारे सांगलीतील तसेच राज्यातील जनतेसह संवाद साधत होते.

सांगली जिल्हा प्रशासन सर्व गोष्टींची काळजी घेत आहे. सर्वत्र निर्णयांचे पालन केलं जात आहे. सांगलीच्या मिरज येथे विशेष कोरोना रुग्णालय स्थापन केले गेले आहे. ज्यात जास्तीच्या व्हेंटिलेटरची सुविधा केली गेली आहे. मॉनिटर, मास्क, पीपीईच्या सुविधा दिल्या गेल्या असल्याचं पाटील म्हणाले.

गरज पडली तर खासगी यंत्रणांची मदत घेतली जाईल. पण नागरिकांना कोणती अडचण होऊ देणार नाही, असं आश्वासनही पाटलांनी दिलं. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

दरम्यान, इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीची भीषणता लक्षात येताच पाटलांनी सूत्र हाती घेताच  काही उपाययोजना करत कोरोना आटोक्यात आला.

महत्वाच्या बातम्या –

-आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

-दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल

-दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

-कोरोनाविरोधातली लढाई मिळून लढू; मोदी-ट्रम्प यांची फोनवरून चर्चा

-अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत