माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दल पोलिसानेच काढले अपशब्द अन् मग…

परभणी | छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊंबद्दल पोलीस कर्मचाऱ्याने अपशब्द काढल्याने पालम शहरासह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे शिवप्रेमी रस्त्यावर उतरले असून संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्ह्याची मागणी करत आहेत.

जगन्नाथ काळे हे पालम पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. या पोलीस कर्मचाऱ्याने फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल अश्लील शब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप आज परिसरात व्हायरल झाली आहे.

ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर शिवप्रेमी प्रचंड तापले आहेत. शिवप्रेमींनी संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी करत पालम तहसील आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आहे. पालम शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन आणि पोलिसांनी शिवप्रेमींना समजावत शांत राहण्यास सांगितलं आहे. त्याबरोबरच संबंधित पोलिसावर कारवाई करणार असल्याचं आश्वासनही दिलं आहे. मात्र अद्याप संबंधित पोलिसावर कारवाई करण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या-

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

शिवसेना राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार; भूमिपूजनानंतर संजय राऊत गरजले

मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम झाले तसे….- नरेंद्र मोदींनी काढली महाराजांची आठवण

“ज्यांच्या रक्तात शिवसेना आणि ज्यांचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता, तो अखेर काळाने निष्ठुरपणे थांबवला”