…तर अमृता फडणवीसांना राज्य सोडून जावं लागेल, हाच उपाय ; शिवसेना मंत्र्यांची फडणवीसांवर टीका

मुंबई | सुशांत सिंहच्या आत्महत्येवरून विरोधी पक्षनेते देवेदंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यामुळे त्या चांगल्याच गोत्यात आल्या आहेत. अशातच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.

भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्ष अमृत फडणवीस सरकारने पोलिसांचं कौतुक केलं. पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत, असा टोलाही परब यांनी अमृता फडणवीसांना लगावला.

दरम्यान, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत

करिना नेपोटीजमवर बोलली अन् कंगनाची सटकली; अन् मग काय…

पावसाचे भयानक वास्तव! मुंबईमध्ये नाल्यात 2 घरे कोसळली, एका महिलेसह दोन मुली बेपत्ता

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली ‘या’ ठिकाणी; पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी कोण?

पुणे हादरलं! 45 वर्षीय महिलेवर बलात्कार करत लाखाचे दागिने लुटले