मेंदूतील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली |  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रणव मुखर्जींनी दिली होती. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं होतं. मात्र त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या डोक्यात मेंदूची गाठ होती. त्या शस्त्रक्रियेसाठी ते रूग्णालयात गेले होते. शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले.

सध्या त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. प्रणव मुखर्जी हे 2021 ते 2017 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. मुखर्जी हे 84 वर्षाचे आहेत.

दरम्यान, पण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे, असं मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘एका तासातच मोदींना ठार करेन’; चक्क मोदींना जीवे मारण्याची धमकी!

राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही- युजीसी

“जे सरकार शिवरायांचा द्वेष करतं ते हिंदुत्ववादी कसं?, भाजपची नकली शिवभक्ती काय कामाची”

…म्हणून सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंग आता ईडीच्या रडारवर!

‘मराठा आरक्षण कायम राहू नये यासाठी मोठं राजकीय षडयंत्र सुरू आहे’; अशोक चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप