सुशांतचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा; मुंबई पोलिसांनी आम्हाला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयच्या हाती दिलं असून सीबीआयनं आपला तपास सुरु केला आहे. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये घोळ आढळल्यानं सध्या सीबीआय सुशांतचं पोस्टोमॉर्टम करणाऱ्या पाच डॉक्टरांची चौकशी करत आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये घोळ आढळल्यानं शनिवारी सीबीआय टीम सुशांतचं पोस्टमॉर्टम ज्या रुग्णालयात करण्यात आलं त्या कुपूर हॉस्पिटलमध्ये पोहचली होती. पोस्टमॉर्टम करणाऱ्या पाचही डॉक्टरांची सीबीआयनं यावेळी चौकशी केली.

सीबीआयनं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एवढ्या त्रुटी कशा?, हा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मुंबई पोलिसांनीच सुशांतचं पोस्टमॉर्टम लवकर उरकायला लावलं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्युच्या वेळेचा उल्लेख नाही. तसेच सुशांतची कोरोना चाचणी देखील करण्यात आली नव्हती. सध्या सीबीआय याप्रकरणी जोडलेला प्रत्येक धागादोरा शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या घरी त्यादिवशी पार्टी नव्हतीच, शेजारील महिलेचा धक्कादायक जबाब; म्हणाली…

‘राज्यातील कृषी खातं झोपलं की काय?’, बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर!

‘कोणतं पदक जिंकू म्हणजे मला अर्जुन पुरस्कार देताल?’; खेलरत्न भेटलेल्या ‘या’ खेळाडूनं थेट क्रीडामंत्र्यांना पाठवलं पत्र

“मोदीजी… तुमच्या कौतुकाची थाप आणि देशातील नागरिकांच प्रेम हाच आमच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे”

“प्रवीण तरडेंनी काल संविधानावर गणपती बसवत केलेल्या अक्षम्य कृत्याची माफी मागितली पण…”