सुशांतचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यापूर्वीच विनापरवाना रिया शवगृहात काय करत होती?

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकड सोपविला आहे. यानुसार सीबीआयनं आपला तपास सुरू केला आहे. सुशांत मृत्यूप्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांतप्रकरणी आणखी एका मुद्द्यावरून सीबीआयच्या रडारवर आली आहे.

रिया चक्रवर्ती 15 तारखेला ज्यावेळी सुशांतचा मृतदेह कुपूर हॉस्पिटलमध्ये शवगृहात होता त्यावेळी शवगृहात गेली होती. रिया कायदेशीर परवाना नसताना देखील शवगृहात पोहोचली होती.

रिया सुशांतची नातेवाईक नसताना तिला हॉस्पिटल प्रशासनानं शवगृहात येऊ कसं दिलं हा प्रश्न सध्या सीबीआयकडून उपस्थित केला जात आहे. ऑटोप्सी रिपोर्ट येण्यापूर्वी रिया तब्बल 45 मिनिटे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती.

दरम्यान, रियाला सुशांतचा अखेरचा चेहरा पहायचा होता असं काही लोकांनी म्हटलं आहे. मात्र, सीबीआय याप्रकरणी रियासोबातच पोस्टमॉर्टम करणाऱ्या पाचही डॉक्टरांची चौकशी करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये घोळ?; पाच डॉक्टर्स सीबीआय टीमच्या चौकशीच्या घेऱ्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक व्हावं, ते खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

गणपतीच्या पाटाखाली भारताचे संविधान ठेवल्यामुळे ट्रोल झालेल्या तरडेंनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…

आर्थिक क्षेत्रात भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

सुशांतच्या संपत्तीचा वारस कोण? सुशांतच्या वडिलांचा मोठा निर्णयशिवसेना 2014-19 दरम्यान भाजपसोबत असती तर…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा