एनसीबीची मोठी कारवाई; अखेर सुशांत प्रकरणातील पहिला आरोपी गजाआड

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपविलं आहे.  सीबीआय टीम याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. रियाच्या व्हाट्सअ‌ॅप चॅटमधून ड्र.ग्ज संबंधित अनेक गोष्टी सीबीआय समोर आल्या होत्या. रिया व्हाट्सअ‌ॅपवरून अनेकांशी ड्र.ग्जबद्दल बोलली होती.रियाचं व्हाट्सअ‌ॅप चॅट समोर आल्यापासून सुशांत प्रकरणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा तपास करत होती.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांत प्रकरणी आता पहिली कारवाई केली आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार गां.जाचे शौकीन आहेत. चित्रपट सृष्टीत हा गां.जा कुठून येतो असा प्रश्न ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमपुढे होता. मात्र, आता ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं याप्रकरणी ड्र.ग पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

परवेज खान उर्फ चिंकू पठाण हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना गां.जा सप्लाय करत असल्याचा एनसीबीला संशय होता. यामुळे मुंबईत दोन ठिकाणी छापा टाकत चिंकू पठाणला ताब्यात घेतलं आहे. तसेच चिंकू पठाणच रिया चक्रवर्तीलाही ड्र.ग सप्लाय करत असल्याचं बोललं जात आहे.

चिंकू पठाण बरोबरच एक मुलगीही ड्र.ग सप्लायरच्या चैनमध्ये असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. ही मुलगी कोण आहे, याचा शोध अद्याप एनसीबीला लागला नाही. एनसीबीची टीम ही मुलगी कोण आहे याचा सध्या तपास घेत आहे.

तसेच चिंकू पठाण बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांच्या घरी काम करणाऱ्या अनेकांच्या संपर्कात होता. तसेच तो चिंकू हा कोड वापरून अनेकांना ड्र.ग्जचा सप्लाय करत होता. सुशांतच्या घरात काम करणारा एक व्यक्ती देखील चिंकू पठाणच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे.

दरम्यान,  चिंकू पठाण हा सुशांत प्रकरणातील गौरव आर्या या हॉटेल व्यावसायिकाच्या संपर्कात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.  गौरव आर्याचे बॉलीवूड आणि उद्योग क्षेत्रात मोठे संपर्क असून गौरव आर्या सर्वांचा विश्वासू होता. त्यामुळे त्याच्या मार्फत बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ड्र.ग पुरवठा केला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. चिंकू पठाण गजाआड गेल्यानं आता रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सुशांतच्या ह.त्येचे पुरावे…’; सुशांत प्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा!

शिवसेनेला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला

‘या’ कारणासाठी रियानं सोडलं होतं सुशांतचं घर; रियाच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा!

सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ

“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”