“राज्याचा कारभार अजितदादा चालवतयात, उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये बिझी”

मुंबई | सध्या राज्याचा कारभार अजित पवार चालवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करण्यात मग्न आहेत, अशी बोचरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय मागे घेतल्याबद्दल अजित पवार यांचे आभार. गेल्या काही दिवसांमधील परिस्थिती पाहता तुम्हीच राज्याचा कारभार चालवत आहात, हे पुन्हा एकदा दिसून आले. शेवटी अनुभव महत्त्वाचा असतो. इतरजण केवळ फेसबुक लाईव्ह करण्यात बिझी आहेत, असा टोला नितेश यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर अजित पवार हेच सर्व निर्णय घेतात. ते मुख्यमंत्री असल्यासारखेच वागतात, अशी वक्तव्यं करून भाजप नेत्यांनी अनेकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आता नितेशी राणे यांनीही शिवसेनेला डिवचलं आहे. त्यामुळे सेना-भाजप दोघांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-“मशिदीत जाणं बंद करु नका, मरण्यासाठी मशिदीसारखी दुसरी चांगली जागा नाही”

-घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांचा शोध घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

-मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण; खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

-देशात कोरोनाच्या चाचण्यांची सर्वाधिक सुविधा महाराष्ट्रात- आरोग्यमंत्री राजेश टोपे

-दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील; संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु