निजामुद्दीन ‘मरकज’साठी गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं- अनिल देशमुख

मुंबई | दिल्लीत शंभरापेक्षा जास्त लोक निजामुद्दीनमधील या कार्यक्रमाला राज्यातून सहभागी झाले होते. मरकज कार्यक्रमाला गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

निजामुद्दीन मधील हे मरकज दिल्लीत कोरोना संसर्गाचं केंद्र ठरलं आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात आयोजित मरकज कार्यक्रमात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लोकांनी सहभाग घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खातं आणि राज्यातले गृह खातं एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

काहीजण संपर्कात येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात कोरोना बाधित झाले आहेत का? याबाबत टेस्टसाठी नेण्यात येत आहे. राज्यातील गृह मंत्रालय हे केंद्रीय गृहमंत्रालय संपर्कात असून केंद्र सरकारच्या समन्वयाने सर्व माहिती घेऊन संबंधित लोकांशी संपर्क करत आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

जे लोक या कार्यक्रमात सहभागी होते त्यांनी स्वत: पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे. त्या काही लोकांमुळे इतर लोकांना विनाकारण त्रास नको, असं देखील गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

-“मशिदीत जाणं बंद करु नका, मरण्यासाठी मशिदीसारखी दुसरी चांगली जागा नाही”

-घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांचा शोध घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

-मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण; खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

-देशात कोरोनाच्या चाचण्यांची सर्वाधिक सुविधा महाराष्ट्रात- आरोग्यमंत्री राजेश टोपे

-दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील; संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु