सुशांतचं घर सोडण्याआधी रियानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता?; सुशांतचा मित्र सिद्धार्थने केला धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपवलं आहे. सीबीआय याप्रकरणी सुशांत प्रकरणाशी जोडलेला प्रत्येक धागा दोरा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतच्या मृत्यूपासून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वादाच्या घेऱ्यात सापडली आहे.

सुशांतचे चाहते रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करत आहे. सुशांतचे अनेक चाहते रियाच्या अटकेची मागणी करत आहेत. आता सुशांत प्रकरणी रियाविषयी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. रियानं सुशांतचं घर सोडण्याअगोदर एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधून डेटा डिलीट केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यानं सीबीआयच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे. सिद्धार्थनं दिलेल्या या माहितीमुळे सीबीआयसमोर याप्रकरणी आणखी नवी आवाहनं तयार झाली आहेत.

सिद्धार्थनं दिलेल्या माहितीनुसार सुशांतसुद्धा डेटा डिलीट करताना तिथेच होता. सुशांतनं रियाला कोणताही विरोध केला नाही. त्यानं रियाला डेटा डिलीट करू दिला होता. मात्र, सिद्धार्थ पिठानीला हार्ड डिस्कमध्ये कोणता डेटा होता याबाबत काहीही माहिती नाही.

सुशांतनं रियाला डेटा डिलीट का करू दिला? हा मोठा प्रश्न सध्या सीबीआयसमोर आहे. तसेच रियाचा यामागे पुरावे नष्ट करण्याचा डाव असल्याची शंका सिद्धार्थनं दिलेल्या माहितीमुळे येवू लागली आहे. सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी याप्रकरणी असं म्हटलं आहे की, ‘डेटा डिलीट करण्याचा अर्थ स्पष्ट आहे कि सुशांतला मारण्याचा प्लॅन केला गेला होता.’

दरम्यान, रियाच्या व्हाट्सअॅप चॅटमधून ड्रग्ज संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं रियावर ड्रगचं सेवन केल्याचा आणि व्यापार केल्याचा आरोप केला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय कर्णधार किंग कोहलीने दिली गोड बातमी, विराटच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा!

खरतनाक! खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर मी…; प्रवीण तरडे संतापले

निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

‘काँग्रेस पक्षांतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मला खडानखडा माहिती द्या’; पवारांनी काँग्रेसच्या ‘या; नेत्यावर सोपवली जबाबदारी

रिया स्वतः ड्रग्ज घेऊन सुशांतलाही ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करत होती?; अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल