काय सांगता! आलं केसांसाठी वरदान ठरू शकतं?; वाचा सविस्तर

सर्वच गृहिणींना आलं परिचयाचं असतं. आल्यामुळे भाजीला एक खमंग वास येतो तसेच वेगळा स्वाद देखील येतो. आल्यामुळे भाजी स्वादिष्ट बनते. एवढंच नाही तर चहा म्हटलं की सुगरणींना आलं हे हवंच असतं. अनेकांच्या घरात नेहमीच आढळणाऱ्या या आल्याचे फायदे क्वचितच कोणाला तरी माहीत असतील. आज जाणून घेऊयात याच आल्याचे फायदे.

आलं हे आपल्या केसांसाठी वरदान ठरू शकतं. बहुतेक स्त्रियांना केसांच्या अनेक समस्या असतात त्यांच्यासाठी आल्याचा रस खूप फायदेशीर असतो. आल्यामध्ये न्युट्रीएंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांना याचा फायदा होतो. केसांची वाढ होण्यासाठी तसेच केसांच्या उत्तम आरोग्यासाठी आल्याचा रस खूप उपयुक्त ठरतो.

आल्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन आणि मिनरल्स आहेत. मॅग्निशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखे अनेक गुण आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ते केसांना पोषण देतात आणि केस वाढीसाठी मदत करतात.

आल्याच्या रसाचा केसांवर वापर करण्यासाठी प्रथम आल्याचा रस काढून घ्या. त्यानंतर एका कॉटनच्या कापडाच्या साहय्याने हा रस केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस पाण्यानं स्वच्छ धुवा. आल्याचा रस फक्त केसांच्या मुळाशी लागला पाहिजे, ही काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. यामुळे केस तंदरुस्त राहतात तसेच केसांच आरोग्यही उत्तम राहतं.

आल्याच्या रसामध्ये अँटी इंफ्लोमेंटरी आणि अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज आहेत. आल्याच्या या गुणधर्मांमुळे स्कैल्पमधील रक्तांचा प्रवाह उत्तम चालतो. यामुळे केस वाढीस फायदा होतो.

केसगळतीसाठी अनेकवेळा केसातील कोंडा कारणीभूत असतो. आल्यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीजसुद्धा असतात. यामुळे आल्याच्या रसाचा केसतील कोंडा नाहीसा होण्यासाठी फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतचं घर सोडण्याआधी रियानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता?; सुशांतचा मित्र सिद्धार्थने केला धक्कादायक खुलासा

भारतीय कर्णधार किंग कोहलीने दिली गोड बातमी, विराटच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा!

खरतनाक! खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर मी…; प्रवीण तरडे संतापले

निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

‘काँग्रेस पक्षांतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मला खडानखडा माहिती द्या’; पवारांनी काँग्रेसच्या ‘या; नेत्यावर सोपवली जबाबदारी