चौकशीच्या घेऱ्यात सापडलेल्या रिया चक्रवर्तीला मोठा झटका!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांत मृत्यूप्रकरणी अनेक आरोप केले जात आहेत. सुशांत प्रकरणी चौकशीच्या घेऱ्यात असलेल्या रियाच्या फिल्म करिअरवर सुद्धा याचे पडसाद उमटू लागले आहेत.

रिया येत्या काळात आपल्या नव्या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार होती. मात्र रिया चक्रवर्तीला आपण आता फिल्ममध्ये घेणार नसल्याचं, दिग्दर्शक लोम हर्ष यांनी सांगितलं आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक आरोप केले जात आहेत. सुशांतचे अनेक चाहते रियाबद्दल संताप व्यक्त करत आहेत. रियाला चित्रपटात घेऊन आम्हाला प्रेक्षकांच्या भावना दुखवायच्या नाहीत. आम्ही चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो, असं लोम हर्ष यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या वर्षीपासून चित्रपटाचं शूटिंग चालू होणार होतं. मात्र, कोरोना महामारीमुळे चित्रीकरण पुढं ढकलण्यात आलं असून आता रियाच्या जागी चित्रपटासाठी नवीन चेहरा घेतला जाईल, असं लोम हर्ष यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकार चीनला आर्थिक क्षेत्रात मोठा दणका देण्याच्या तयारीत

…तर महाविकास आघाडीने सत्ता भाजपकडे सुपूर्द करावी- सुजय विखे पाटील

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने महाराष्ट्रतील या जिल्ह्यातील ‘ही’ दोन गावं घेतली दत्तक!

अजित पवारांची ‘ही’ स्टाईल मला भावते- रोहित पवार

सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचा टाळा तोडणाऱ्याने सांगितलं त्यावेळचं खरं वास्तव; टाळा फोडला तेव्हा…