ना आमदार, ना खासदार, कोल्हापुरातून भाजप हद्दपार, जिल्हा परिषदेतील सत्ताही गेली

कोल्हापूर |  काेल्हापुरात भाजपची जिल्हा परिषदेतली सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपच्या अरुण इंगवलेंचा पराभव करत काँग्रेसच्या बजरंग पाटलांनी विजय मिळवला आहे. बजरंग पाटलांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अरुण इंंगवले यांना अणुक्रमे 24 तर बजरंग पाटलांना 41 मते मिळाली आहेत.

कोल्हापुरात दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत, शिवाय महानगरपालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता जिल्हापरिषदही हातातून गेल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. अडीच वर्षांत भाजपला जिल्हा परिषदेची सत्ताही टिकवता आलेली नाही.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या फॉम्युल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता टिकवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आताेनात प्रयत्न केले. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला साेबत घेण्याची रणनीती आखली.

दरम्यान, काेल्हापुरात अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला 67 पैकी 14 जागा मिळाल्या हाेत्या तर काँग्रेसलाही 14 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी बरोबरच स्थानिक आघाड्यांना एकत्र घेण्यात काँग्रेस मागे पडली होती. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच काेल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली हाेेती.

महत्वाच्या बातम्या –