लोकसभेत सुप्रिया सुळेंनी मारली बाजी; प्रश्न विचारण्यात अव्वलस्थानी

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च’ने केलेल्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यावरील चर्चेत सहभागी होण्यात सुळे या आघाडीवर आहेत.

सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुभाष भामरे हे सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार ठरले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या 10 खासदारांच्या यादीत महाराष्ट्राचे 6 खासदार आहेत. त्यामुळे प्रश्न विचारण्याच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे असल्याचं दिसतंय.

संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर 2019 या काळात सुुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सर्वाधिक 167 प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच विविध राष्ट्रीय विषयांवरील 75 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

दरम्यान, सरकारला प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्यात मी सक्रीय असते, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे. सुळे या सलग तीन वेळा बारामतीमधून खासदार आहेत.

महत्वाच्या बातम्या-