“चंद्रकांत पाटलांचं झालंय असं की, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

मुंबई | महाविकास आघाडीवर सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातील कोथरूडचे आमदार यांच्यावर आत्ता दोन दिवसांमागे आपल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याने न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

दादांचं म्हणजे असं झालंय की, स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं म्हणत काँग्रेसने पाटलांना टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

पाटलांविरूद्ध अभिषेक हरिदास यांनी खोटी माहिती सादर केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. पुणे न्यायालयाच्या दंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी आदेश दिला आहे. मात्र पाटलांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

दरम्यान, बातम्यांच्या माध्यमातून मला समजलं की कोणीतरी माझ्याविरूद्ध तक्रार दखल केली आहे. परंतू मला अजून कोणत्याही प्रकारची न्यायालयीन प्रत आली नाही. त्यामुळे या विषयावर आत्ता भाष्य करता येणार नसून ही तक्रार राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तर

कोरोनावर मात करायला लागतील इतकी वर्ष; जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचं मत

काय सांगता भेंडी एवढी लाभदायी आहे! सविस्तर वाचा

रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यातील नातं काय?; रिया सुशांतच्या मृत्युपुर्वीच म्हणालेली की…

शिर्डीचं साई मंदिर खुलं करा अन्यथा…; सुजय विखेंचा राज्य सरकारला इशारा