सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तर

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ईडी, बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तपास करत होते. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयच्या हाती सोपावलं आहे. त्यानुसार सीबीआय एजंसीनं आता आपला तपास सुरू केला आहे.

गुरुवारी संध्याकाळी सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. सीबीआयला हे प्रकरण विविधअंगी तपासून पहावं लागणार आहे. सुशांतचा खू.न झाला होता का?,या प्रश्नाचं उत्तर प्रथम सीबीआयला शोधावं लागणार आहे.

सुशांत सिंह राजपूतची ह.त्या की आत्म.ह.त्या याच शोध घेणं सीबीआयच प्रथम काम आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सीबीआय प्रथम सुशांतच्या वांद्र्यातील घराची तपासणी करणार आहे. सुशांतच्या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई पोलिसांना दिलेले जबाव, यामध्ये सुशांतच्या मृ.त्युच्या आधीच्या दिवशी उपस्थित असलेले सुशांतचे मित्र त्यासोबत रियाचा भाऊ यांची पुन्हा चौकशी होणार आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृ.त्यूसंबंधित आत्तापर्यंतचे सर्व अहवाल, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सर्व सीबीआय सुरुवातीला तपासणार आहे. तसेच याप्रकरणी संपूर्ण घटनेचं रिक्रेएशन केलं गेलं आहे. सीबीाआयने काल रिक्रेएशन करताना नीरज कुमार आणि सिद्धेश पिटानी यांनी दिवसभर आपल्यासोबत ठेवलं होतं. इथून पुढचा तपास सीबीआय कशा पद्धतीने करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

…हा तर उद्धव ठाकरे सरकारला जबरदस्त झटका- बबिता फोगट

गेल्या 70 वर्षात नाही झालं ते येत्या सात ते आठ महिन्यात होणार- राहुल गांधी

‘…तेव्हा मराठी कलाकार नाही दिसले त्यावेळी दिशा, जॅकलीनस पाहिजे असतात’; राणेंचं जोरदार टीकास्त्र!