महेश भट यांचं रियासोबतचं ‘ते’ दृश्य पाहून नेटकरी संतापले; पाहा व्हिडीओ

मुंबई | प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि सुशांतची कथित गर्लफ्रेड रिया यांचा एक जुना व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या सुशांच्या प्रकरणाच्या तपासात रियाची ईडीची चौकशी चालू आहे. याआधी सुशांतच्या मरण्याला बॉलिवूडचे मातब्बर लोक जबाबदार असल्याची चर्चा होती. अशातच रिया आणि महेश भट यांचा व्हिडीओने त्यांच्यावर संतप्त नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

व्हिडीओमध्ये रिया माध्यमांसोबत बोलत आहे आणि त्यावेळी महेश भट यांनी रियाचा हाताला घट्ट पकडलं आहे आणि रिया बोलत असताना ते मध्येच तिच्या खांद्यावर डोक ठेवताना दिसत आहेत.

ऐकायला जास्त काही वाटत नाही मात्र दिसताना खूप विचित्र दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी रिया आणि भट यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  हा व्हीडिओ जलेबी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेचा आहे. व्हीडिओ मध्ये रिया चक्रवर्ती, महेश भट आणि अभिनेता वरुण मेहता दिसत आहेत.

दरम्यान, सुशांत असं काही मोठं पाऊल उचलणार याची मला माहिती असल्याचं महेश भट यांनी म्हटलं होतं. सडक 2 च्या वेळी सुशांतचं आणि माझं बोलणं झाल्याचं भट यांनी सांगितलं. आत्ता मध्ये सडक 2 चा ट्रेलर आला तेव्हा मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी निषेध म्हणून ट्रेलरला अनलाईक केलं.

 

 

View this post on Instagram

 

What are you’re views on this?

A post shared by Bollywood 1M💙 (@lnbollywood) on

महत्वाच्या बातम्या-

राऊतांनीच सुशांतची केस सीबीआयकडे जाण्यासाठीचं काम सोप्प केलं आता तेच तोंडावर पडलेत- नारायण राणे

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र- संजय राऊत

सुशांत प्रकरण सीबीआयकडे जाताच बॉलीवूड क्वीन कंगना रनौत म्हणतेय…

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; भाजप नेत्या आणि शरद पवारांच्या नातवाची एकच प्रतिक्रिया!

महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची गरज; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका