एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई | मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.

आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. यात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 15 जण जखमी अवस्थेत आढळले. बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांपैकी 5 ते 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या एसटी बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती आणि कोणते प्रवासी याची माहिती अद्याप आमच्याकडे नाही. आम्ही लवकरच सविस्तर माहिती देऊ. तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना माहिती घेण्यासाठी हेल्पलाईनही सुरु करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहेत.

नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये 50 ते 55  जण होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

 “देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू 

‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्यायचं हं’, चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट; पाहा व्हिडीओ 

‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर, म्हणाली…