मोठी बातमी! आमदारांनंतर आता खासदारांनी उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं

मुंबई | शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांनंतर आता खासदारांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टेंशन वाढलं आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याची माहिती आता समोर आलीये.

शिवसेनेचे 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर आहे. एकूण18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.

धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामील होणार आहे. लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मेळाव्याला दोघांनाही दांडी मारली होती.

दरम्यान, दुसरीकडे आता, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी पत्र लिहून शिवसेनेबद्दल आपली नाराजीही बोलून दाखवली आहे.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले आहे, अशी टीकाही कदम यांनी केलीये.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

 “देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू 

‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्यायचं हं’, चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट; पाहा व्हिडीओ