दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…

पुणे | यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या शेवटच्या काही विषयांच्या पेपरवर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे एक-दोन विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे साधारणत: मे-जून मध्ये लागणाऱ्या दहावी-बारावीच्या निकालाकडे आता मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागलं आहे. याचविषयी राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी मोठा खुलासा केला आहे.

राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचं संकलन आणि निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये उलट-सुलट याविषयी चर्चा सुरू आहे.

साहजिक लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे निकाल लांबणीवर पडणार आहे. परंतू निकालाची तारीख किती असू शकते किंवा निकाल कोणत्या दिवशी लागू शकतो, हे मात्र राज्य मंडळाने आणखी जाहीर केलेलं नाहीये

 

महत्वाच्या बातम्या-

-“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”

-“उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले हेच फडणवीसांना खुपतंय”

-“…म्हणून भारतात कोरोनाचा स्फोट होणार, जून अखेरपर्यंत देशात 16 लाख कोरोनाबाधित होतील”

-“दाऊद आतापर्यंत 6 वेळा मरून जिवंत झालाय, मोदी सरकारने काय ते एकदाच सांगावं”

-राऊतांच्या टीकेनंतर आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सोनू सूदचं मराठीमध्ये ट्विट, म्हणतो…