मुंबई | सध्याच्या भारत-चीन वादावर प्रकाश टाकताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. तसंच चीनी मालामुळे अर्थव्यवस्थेला कसा फटका बसत आहे हे सांगताना त्यांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
एका बाजूला ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे ढोल पिटायचे व दुसर्या बाजूला चीनची बाजारपेठ खुली ठेवायची. यातून चीनला आर्थिक बळ मिळते. कोरोनामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
केंद्र सरकारच्या या धोरणामुळेच बेरोजगारी वाढली आहे आणि हिंदुस्थान-चिनी मालाची बाजारपेठ खुली करून चीनच्या राक्षशी महत्त्वाकांक्षेला आणि साम्राज्यवादालाच ताकद देत आहे. चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, असं अग्रलेखाच्या सरतेशेवटी राऊत म्हणाले.
दुसरीकडे पाकिस्तानशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी, असे आम्हाला वाटत नाही. पाकिस्तान हा चीनचा गुलाम आहे. मात्र चीनशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी व ती पंतप्रधान मोदी यांच्यापाशी आहे. त्यामुळे चीनला घाबरण्याचे कारण नाही. देशाने चिंता करू नये. सीमेवरील सैन्य खंबीर आहे. 1962 सालचा हिंदुस्थान आज नाही. आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत, असा टोला लगावत हे चीनला भारत काय आहे ते दाखवून द्यायची हीच वेळ आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…
-“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”
-“उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले हेच फडणवीसांना खुपतंय”
-“…म्हणून भारतात कोरोनाचा स्फोट होणार, जून अखेरपर्यंत देशात 16 लाख कोरोनाबाधित होतील”
-“दाऊद आतापर्यंत 6 वेळा मरून जिवंत झालाय, मोदी सरकारने काय ते एकदाच सांगावं”