10 हजाराचे झाले 1 लाख! टाटा समुहाच्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराला सोन्याचे दिवस आले आहेत. कोरोनानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली होती. ती वाढ सध्याही चालूच आहे.

कोरोना काळात आयटी सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टर डबघाईला आले होते. त्यावेळी ऑटोमोबाईल सेक्टरच्या शेअरमध्ये घट झाल्याचं दिसून आलं होतं.

कोरोनानंतर गुंतवणूकदारांनी कंपन्यांवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि आज त्यातील काही शेअर हे सर्वकालिन उच्चांकावर पोहोचले आहेत.

अशातच टाटा समुहाच्या एका कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल 1000 टक्के बंपर परतावा दिला आहे. टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड ही टाटा समुहाची कंपनी आहे.

गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स तेजीत दिसत आहे. सध्या या शेअर्सची किंमत 80.05 रूपये आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडमधील तेजी ही अशीच काही दिवस राहू शकते.

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअर्सची किंमत 17 नोव्हेंबर 2020मध्ये 9 रूपये इतकी होती. त्यावेळी अनेकांनी 10 हजाराच्या संख्येत गुंतवणूक देखील केली होती. त्यांना आता 1 लाखाचा परतावा मिळाला आहे.

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड ही टाटा टेलीसर्व्हिसेसची सब्सिडरी कंपनी आहे. टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड ही आपल्या सेगमेंटमधील आघाडीवरची कंपनी आहे.

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडने गेल्या महिन्यात स्मार्ट इंटरनेट बेस सर्व्हिसेस कंपनी सुरू आहे. त्यामुळे आता या कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता अनेक गुंतवणूकदारांची नजर या शेअर्सवर असणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टाटा समुहाचे सर्वच शेअर्स शेअर बाजारात नावलौकिक मिळवताना दिसत आहे. अनेक टाटा समुहाच्या कंपन्या सध्या उच्चांक पातळीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“शरद पवारांचं दिल्लीत नावही घेत नाहीत आणि दखलही घेत नाहीत”

‘आम्ही बारामतीत गेलो तर…’; नाना पटोलेंचं शरद पवारांना थेट आव्हान

अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं”