मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. यावर निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल, असं मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात भाजपचं सरकार असताना अशा आपत्तीच्या प्रसंगात कसे निर्णय घेण्यात आले. नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करुन दिली त्याची उदहारणे देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच फडणवीसांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना मोदी सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम 370 रद्द करणं हा महत्वाचा निर्णय होता, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी तुम्हाला शेवटची ताकीद देतोय’; अरविंद केजरीवाल संतापले
-रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं- अमोल कोल्हे
-पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या; राजेंद्र विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी
-विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू
-मंत्री आदित्य ठाकरेंकडून पर्यावरण खात्यासंबंधी मोठा बदल!