राष्ट्रवादी ची सत्ता आहे.. मग एकच शिव जयंती झाली पाहिजे; नितेश राणेंचा शिवसेनेला चिमटा

मुंबई | राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे! एकदा काय तो दोन शिव जयंतीचा वाद मोडून टाकाच !! एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे! हीच ती वेळ! जय शिवराय! , असं ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या शिवजयंतीबाबतच्या भूमिकेला आपला जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.

राष्ट्रवादी सत्तेत असल्याने शिवजयंती एकदाच झाली पाहिजे, असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी. यासाठी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी काल ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट सोडावा, असं आवाहन केलं.

दरम्यान, गेल्यावेळी भाजपसोबत सत्तेत असतानाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजंयती साजरी करण्याची मागणी केली होती.

 

महत्वाच्या बातम्या- 

-मी पाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो; तानाजी सावंतांनी दिला ठाकरे सरकारला इशारा

-“काळजी करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पाठिशी आहेत”

-विजया रहाटकर यांचा राज्य महिला अध्यपदाचा राजीनामा

-तुमचं 3 महिन्यात सरकार जाणार मग कर्जमाफी कधी करणार??; विनायक मेटेंची टीका

-दिल्लीचा गड आम्हीच काबीज करणार; रावसाहेब दानवेंना विश्वास