जालन्यात मारहाण झालेल्या प्रेमी युगुलाचं बुलढाण्यात पार पडला विवाह

बुलढाणा | जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. याप्रेमी युगुलांनी बुलडाण्यात लग्न केलं आहे. बुलढाण्याच्या मेंढगावातील मंदिरात त्यांनी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रेमी युगल काही दिवसांपूर्वी जालन्यातील गोंदेगावात फिरायला गेले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरूवात केली.

आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळ असल्यामुळे आम्ही फिरायला आलो, असं तरूण काकुळतील येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरूणांनी तरूणीच्या वडिलांना सांगितलं आहे.

दरम्यान, प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या- 

-राष्ट्रवादी ची सत्ता आहे.. मग एकच शिव जयंती झाली पाहिजे; नितेश राणेंचा शिवसेनेला चिमटा

-मी पाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो; तानाजी सावंतांनी दिला ठाकरे सरकारला इशारा

-“काळजी करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पाठिशी आहेत”

-विजया रहाटकर यांचा राज्य महिला अध्यपदाचा राजीनामा

-तुमचं 3 महिन्यात सरकार जाणार मग कर्जमाफी कधी करणार??; विनायक मेटेंची टीका