नवी दिल्ली | कोरोना महामरीचा मुकाबला करण्यासाठी सध्या सर्वत्र लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानंतर लसीकरणाच्या गतीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका होत आहे.
केंद्र सरकारनं मोठ्या दणक्यात मोदींच्या वाढदिवसाला विक्रमी लसीकरण केलं होतं. यावरून देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. पण सध्या लसीकरणाचा वेग मंदावल्याचं पहायला मिळत आहे.
काॅंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यावरूनच भाजपवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला विक्रमी लसीकरण होऊ शकतं तर आता का नाही, असा सवाल सोनिया गांधी यांनी विचारला आहे.
पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी मोदींनी केली नसल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील केंद्र सरकाच्या अपयशावर गांधी यांनी बोट ठेवलं आहे.
ऑक्सिजनसाठी तडफडणारे रूग्ण, बेसहारा लोकांचं दुख सरकार समजू शकलं नाही, अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदी सरकारवर सोनिया गांधी यांनी केली आहे.
कोरोना विरोधातील लढाईला मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंट का समजत आहे?, असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे. मोदी सरकारच्या कोरोना विषयक धोरणाचे वाभाडे काढण्याचं काम सोनिया गांधी यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी 2 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण होऊ शकतं असेल तर दररोज का होत नाही?, असा सवाल केंद्र सरकारला सोनिया गांधी यांनी विचारला आहे.
देशातील लोकसंख्येच्या एकतृतीय लोकसंख्येपेक्षाही कमी लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यातही सरकार म्हणतंय की अजून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत काहीच करत नसल्याची टीका गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, देशभरातील विरोधी पक्ष मोदी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर जोरदार टीका करत आहेत. असं असतानाही केंद्र सरकार लसीकरण जोरदार चालू असल्याचा दावा करताना दिसत आहे.
सोनिया गांधी यांनी महागाई, लसीकरणाची गती यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपतर्फे या टीकेला काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“अजित पवार फसवाफसवी आणि बनवाबनवी करणं थांबवा”
सोनं खदेरी करणाऱ्यांसाठी सुर्वणसंधी, सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट
“…पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर एक शब्द देखील काढला नाही”
पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
’25 वर्ष आम्ही नको ती अंडी उबवली’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे म्हणतात…