“अजित पवार फसवाफसवी आणि बनवाबनवी करणं थांबवा”

मुंबई | राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात चांगलंच राजकीय युद्ध पेटलं आहे. आयकर विभागानं अजित पवार यांच्याशी संबंधित कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे.

जरंडेश्वर कारखाना प्रकरणी अजित पवार यांच्या नातेवााईकांना या प्रकरणात गोवण्यात आल्यानं अजित पवार प्रचंड नाराजा झाले होते. अशातच त्यांची संपत्ती जप्त केल्याचा दावा सोमय्या यांनी केल्यानं वातावरण तापलं आहे.

अजित पवार यांनी लोकांना मुर्ख बनवू नये. अजित पवार यांनी फसवाफसवी आणि बनवाबनवी थांबवावी, अशी टीका किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

अजित पवार आणि त्यांच्या परिवाराच्या नावावर हजारो कोटींची संपत्ती आहे. तब्बल आठ राज्यात त्यांच्या बेनामी संपत्तीचं साम्राज्य पसरलं आहे. सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर आणखीन गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवार यांच्याशी संबंधित अनेक जणांकडे बेनामी मालमत्ता आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग आणि मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी 13 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? बनवा बनवी आणि फसवा फसवी थांबवा, अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केलीये.

काही दिवसांपूर्वी  प्राप्तिकर विभागाने अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट निर्मल बिल्डिंग कार्यालय येथे छापेमारी केली होती. आता तेथील मालमत्ता जप्त केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई… यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. असं समजत असल्याचं ट्विट किरीट सोमय्या केलंय. परिणामी किरीट सोमय्या आणि अजित पवार यांच्यातील राजकीय युद्ध आणखीन वाढलं आहे.

जरंडेश्वर कारखान्यापासून चालू झालेली आरोपांचा मालिका सोमय्या यांनी कायम ठेवली आहे. ईडी, आयकर विभाग, सीबीआय, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यात मोठ्या कारवाया पार पाडल्या जात आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात येत आहे. तर भाजपनं केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करत आसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं खदेरी करणाऱ्यांसाठी सुर्वणसंधी, सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट 

“…पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर एक शब्द देखील काढला नाही” 

पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

’25 वर्ष आम्ही नको ती अंडी उबवली’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे म्हणतात…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिली पुन्हा एकदा दिवाळीची भेट