“माझ्या वडिलांची काळजी घ्या, मी लवकरच पाटण्याला येईन….”

मुंबई |  अतिशय हुशार सुस्वभावी आणि हसतमुख अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले आहेत. यशाच्या शिखरावर असताना त्याने आयुष्य का संपवले? याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याच्या आत्महत्येने परिवार पुरता गळून पडलाय. त्याचं तीन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांशी बोलणं झालं होतं.

कोरोनाच्या कठीण काळात त्याला त्याच्या वडिलांची चिंता सतावत होती. त्याने तीन दिवसांपूर्वी वडिलांना फोन करून तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं होतं. बाहेर फार कठीण काळ चालूये. तुम्ही बाहेर जाऊ नका, अशी काळजीची सूचना त्याने वडिलांना केली होती.

त्यानंतर वडिलांच्या केअर टेकर असलेल्या व्यक्तीसोबत सुशांतचं बोलणं झालं. माझ्या वडिलांना कोरोनापासून वाचवा. मी लवकरच पाटण्याला येईन. त्यांना फिरायला घेऊन जाईन. तोपर्यंत तुम्ही माझ्या वडिलांची काळजी घ्या, असं सुशांतने केअर टेकरला सांगितलं होतं. सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कुटुंबियांना टीव्हीवरूनच मिळाली. ही बातमी कळकाच सुशांतच्या वडिलांची शुद्ध हरपली. काही काळानंतर ते भानावर आले.

विशेष म्हणजे अपयश आल्यास आत्महत्या हा पर्याय नाही असा संदेश देणारा ‘छिछोरे’ हा सुशांतचा आलीकडच्या काळातला सर्वाधिक चर्चेतला चित्रपट होता. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर बेतलेल्या सिनेमातून लोकप्रिय झालेल्या सुशांतने इतकं टोकाचं पाऊलं का उचललं असावं? याचा अद्याप उलगडा झालेला नाहीये. दरम्यान, आज सुशांतवर मुंबईत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी त्याचे कुटुंबिय बिहारवरून मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…

-हात जोडून सांगतो… द्वारकारनाथ संझगिरी यांची कोरोनाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी पोस्ट

-देशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी

-सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा

-मुंबई लोकल आजपासून पुन्हा सुरू… फक्त ‘यांनाच’ मिळणार प्रवेश