3 आमदारांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली?; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिलं मत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी नोंदवलं. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानाला सुरूवात झाली असून यादरम्यान 3 आमदारांनी राष्ट्रवादीचं टेंशन वाढवल्याचं दिसतंय.

राष्ट्रवादीचे तीन आमदार अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. यामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश आहे.

अण्णा बनसोडे हे प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत, तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने आतापर्यंत येऊ शकले नसल्याचे समजते. मात्र दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप अशा चार प्रमुख पक्षांच्या आमदारांना मुंबईतील विविध ठिकाणच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आजच्या निवडणुकीत एका आमदाराच्या मताला महत्व आहे. यासाठीच मतं गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन” 

“मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही, कारण…” 

‘पक्षादेश पाळणं आमच्या रक्तातच’; आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना 

“तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना सैन्य दलात घेणार नाही” 

“काही खोटारडी लोकं मनाला वाटेल तसं बोलत असतात”