‘त्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण

मुंबई | विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आजच्या निवडणुकीत एका आमदाराच्या मताला महत्व आहे. यासाठीच मतं गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. याआधी भाजप नेत्याने ट्विट करत मोठा दावा केला आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी ट्विट करत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

काळ आला होता भाऊ किंव्हा भाईवर, पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा, असं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना अनिल बोंडेंनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ माजली आहे. तसेच दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा दुसरा उमेदवार असलेल्या भाई जगताप यांची जागा धोक्यात असल्याची चर्चा होती.

काँग्रेसकडे स्वत:ची 42 मते असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता आहे. यामुळे आता निकाल काय लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

3 आमदारांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली?; महत्त्वाची माहिती समोर  

“मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन” 

“मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही, कारण…” 

‘पक्षादेश पाळणं आमच्या रक्तातच’; आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना 

“तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना सैन्य दलात घेणार नाही”