‘या’ कारणाने सुशांतला ते ३ सिनेमे करता आले नाहीत, पोलिसांचा वेगात तपास सुरु

मुंबई| सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथकं तयार केली असल्याची माहिती आहे. या पथकांद्वारे सुशांतचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांची चौकशी करण्यात येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने एका प्रोडक्शनसोबत एकूण तीन चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट केले होते. मात्र यापैकी केवळ सुशांतचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ प्रदर्शित झाला. या कॉन्ट्रॅक्टमुळे त्याला इतर सिनेमे करता आले नाहीत. दरम्यान अजून एक अभिनेत्याने या प्रोडक्शन हाऊसशी काँट्रॅक्ट केला होता आणि त्याला दुसरे चित्रपट करण्याची परवानगी देण्यात आली होती.

‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’साठी सिनेमांसाठी सुशांतला काम देण्याचा विचार संजय लीला भन्साळी यांनी केला होता, मात्र या कॉन्ट्रॅक्टमुळे हे चित्रपट त्याला मिळाले नाही. इतकंच नव्हे तर ‘बेफिक्रे’ हा सिनेमा देखील सुशांत करणार होता पण ती संधीही त्याला मिळाली नाही, असंही कळतंय. हे तिन्ही सिनेमे एकाच अभिनेत्याला मिळाले असून त्या अभिनेच्याचंही याच प्रोडक्शन हाऊसबरोबर कॉन्ट्रॅक्ट होतं मात्र त्याला दुसरे सिनेमे करण्याची परवानगी मिळाली आणि सुशांतला नाही या गोष्टीला अनुसरून पोलीस तपास करतायत.

सुशांतचा ‘ड्राइव्ह’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर सुशांत आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये खटके उडाले होते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जागतिक आरोग्य संघटनेचा दिलाय हा इशारा; जग आता मोठ्या संकटात!

-3 वर्षे कॉलिंगसाठी साधा मोबाईल वापरला; अडीच वर्षात क्रॅक केल्या 4 स्पर्धा परीक्षा!

-वारीच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा

-…तर कोरोनाचा उद्रेक अटळ, तुकाराम मुंढे यांचा गंभीर इशारा

-“मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या”