महाविकास आघाडीचा सरकारचा मोठा निर्णय राज्यातील 305 शाळा होणार बंद

मुंबई | 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या 305 शाळा बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय शासनाच्या या निर्णयाला शिक्षण संघटनांनी विरोध करणं सुरु केलं आहे.

20 हून कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुन या शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था जवळच्या इतर शाळेमध्ये करण्यात येणार आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा चावलणं शक्य नसल्याचं सांगत शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळा नफा तोटा कमवण्याचे साधन आहेत काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

917 वस्तीस्थानामधील 4850 विद्यार्थ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फटका बसणार असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अधिकची पायपीट करावी लागणार आहे. छोट्या वस्त्या, गावपाड्यावरील शाळांचा यात समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 51, पुणे 11, उस्मानाबाद 9, सोलापूरमधील 11 शाळा बंद होणार आहेत.

दरम्यान, मागील सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली होती. आता भाजप या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिवस्मारकाच्या कामात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही- अशोक चव्हाण

-नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात…

-मराठा आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक

-हे तीन पक्षाचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालण्याच्या नादातच पडेल- रावसाहेब दानवे

-दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घाला; गृहमंत्रालयाने दिले आदेश