विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात देखील कोरोना (Corona) रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ओमिक्राॅन (Omicron) रूग्णसंख्या वाढत असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता राज्यात चिंतेचं वातावरण आहे.

सध्या मुंबईमध्ये विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. अशातच आता विधानसभेतच कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती आता मिळाली आहे. विधानसभा अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली आहे.

अधिवेशनाचं तीन दिवसांचं कामकाज पुर्ण झालं आहे तर आणखी दोन दिवस अधिवेशन पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या टेस्ट केल्या जाण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार समीर मेघे यांनी फेसबूक पोस्ट लिहीत याबद्दलची माहिती दिली होती. मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी, अशी विनंती समीर मेघे यांनी केली आहे.

अधिवेशनातीलच एकून 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता सरकार आणि आमदारांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येतंय.

समीर मेघे यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, अधिवेशनात आमदार विनामास्क दिसले होते. काही आमदारांनी मास्क घातलं नव्हतं. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व आमदारांना मास्क न घातल्याने झापलं देखील होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींनी दिला ‘हा’ नारा

“सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडीओ 3 दिवसात हटवा”, गृहमंत्र्यांचा अल्टीमेटम

अभिमानास्पद! युवराज सिंगची ‘ती’ खास बॅट अंतराळात पोहोचली; पाहा व्हिडीओ

अजित पवार म्हणतात, “तो राज्यपालांचा अधिकार पण ज्या परंपरा…”