मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) समोर आलेल्या ओमिक्रॉन (B.1.1.529) व्हेरिएंटने संपुर्ण जगाची चिंता वाढवली आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनचा संसर्गाचा वेग अधिक असल्याने राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकारकडून (Central Government) अधिक दक्षता घेतली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे.

मुंबईमध्ये नव्या ओमिक्रॉन विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या 27 इतकी आहे. राष्ट्रीय विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात 31 नवे ओमिक्रॉन रूग्ण आढळले आहेत. तसेच ओमिक्रॉन सर्वेक्षणामध्ये प्रत्येक शहरातील आकडेवारी दिली आहे.

पुणे आणि महानगरपालिका क्षेत्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 22 वर पोहोचली आहे. सातारा आणि उस्मानाबादेत ओमिक्रॉन बाधितांची संख्या प्रत्येकी 5 इतकी आहे. तर पिंपरी चिंचवड शहरात आता पर्यंत 19 रूग्ण आढळले आहेत.

कल्याण डोंबिवली, नागपूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी 2 रूग्ण आढळले आहेत. रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेत असल्याचं सिंधुदुर्ग येथे सांगितलं होतं.

ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने देखील धोक्याचा इशारा दिला होता. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशन्समुळे ओमिक्रॉन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी शनिवारी ओमिक्रॉन विषाणूबाबत एक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रूग्ण इतर राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स सिनेमा हॉल्स, यांबाबत निर्बंध जारी करण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

जर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ओमिक्रॉनचीच असेल अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. तसेच दुप्पटीन रूग्ण वाढण्याचं प्रमाण तसचं राहिल तर राज्यात कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असंही राजेश टोपे म्हणाले होते.

तसेच परदेशात लाखात रूग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. यो वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही तर रूग्णवाढीने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, भारतात आतापर्यंत ओमिक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या 500 इतकी आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 141 जणांना आतापर्यंत ओमिक्रॉन संसर्ग झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 
येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींनी दिला ‘हा’ नारा

“सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडीओ 3 दिवसात हटवा”, गृहमंत्र्यांचा अल्टीमेटम

अभिमानास्पद! युवराज सिंगची ‘ती’ खास बॅट अंतराळात पोहोचली; पाहा व्हिडीओ

अजित पवार म्हणतात, “तो राज्यपालांचा अधिकार पण ज्या परंपरा…”