आमची सर्व अंतर्गत यंत्रणा सांगतेय की, भाजपचा पराभव अटळ – राहुल गांधी

नवी दिल्ली : अर्ध्यापेक्षा जास्त निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आमची सर्व यत्रणा सांगते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की हारणार आहेत, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

दिल्लीमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप हारणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

-राहुल गांधींचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-

-मोदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था डॅमेज

मोदींनी देशाला सांगितलं होतं की, 2 कोटी रोजगार देऊ पण देशात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. भाजपची खोटी आश्वासने, नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचार आणि बेरोजगारीमुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. कुठेही गेलं तर फक्त ‘चौकीदार’ म्हटल की ‘चोर है’ असं ऐकायला मिळत असतं.  

काँग्रेसच्या काळात मोदी जर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत असतील तर ते भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत. आमच्या काळात सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसने नाही तर आर्मीने केले आहेत. 

सध्या आर्मी, एअरफोर्स, नेव्ही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मालमत्ता समजत आहेत. मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेला गंभीर उध्वस्त केलं आहे. मग ते नोटबंदी असो वा गब्बर सिंग टॅक्स असो. 

मी मोदींसारखं 2 कोटींचं आश्वासन देणार नाही पण दरवर्षी 22 लाख तरुणांना सरकारी नोकरी मिळेल, असा आश्वासन राहुल गांधींनी केलं आहे. 

-न्याय योजनेमुळे अर्थव्यवस्था सुधारेल

न्याय व्यवस्थेतून गरिबांना 72 हजार रुपये मिळतील. यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास राहुल गांधींनी यावेळी दिला. 

-सरकारी संस्थांना वाचवणं, हे आमचं पहिलं ध्येयं

मोदी म्हणतात, मी देशाच्या सुरक्षेसाठी काम करतोेय. पण भारतीय सैन्य गेली 70 वर्षापासून चांगलं काम करतंय, राफेल करारातून चौकीदाराने 30 हजार कोटी रुपयांची चोरी केली. 

मोदी आणि भाजपला पराभूत करुन भारतातील सरकारी संस्थांना वाचवणं हे आमचं पहिलं ध्येय आहे. भारतासमोर अर्थिक संकट आहे मोदी हे स्विकारत नाहीत. 

दहशतवादी मसूद अजहरला भाजपने पाकिस्तानात सोडलं, काँग्रेस असं कधीच करणार नाही. मसूद हा दहशतवादी आहे. त्याच्याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

-एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी भित्रे पंतप्रधान

निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी आहे. मादींच्या चेहऱ्यावर पराभव दिसत आहे. मोदींना आव्हान देतो की त्यांनी खुल्या व्यासपीठावर माझ्याशी चर्चा करवी, मी अनिल अंबानींचं घर सोडून कुठेही चर्चा करायला तयार आहे.

मोदींनी देशाची शान संपवून टाकली आहे. देशातील शांतता मोदींनी संपवली. त्यांनी पाच वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. दबाव आला की पंतप्रधान पळून जातात. असा त्याचा स्वभाव आहे. 

मोदींनी जनतेचा पैसा घेतला पण आम्ही जनतेला पैसे दिले.